पुन्हा एकदा २६ जुलैची रात्र मुंबई आणि मुंबई परिसरातील नागरिकांमध्ये पावसाची दहशत निर्माण ठरणारी रात्र ठरली. मुंबईत शुक्रवार २६ जुलै सकाळी ८.३० ते शनिवार २७ जुलै या काळात पडलेला पाऊस हा दहा वर्षांमधील जुलैमधील सर्वाधिक पाऊस होता. सांताक्रूझ येथे २४ तासांमध्ये २१९ मिमी, तर कुलाबा येथे ९० मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला होता. ढगांचा गडगडाट आणि वीजांचा लखलखाटही सुरू होता.
from The Maharashtratimes https://ift.tt/2K44KSk
No comments:
Post a Comment