Saturday, February 1, 2020

हुश्श! राज्यात एकही करोनाचा रुग्ण नाही

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेल्या सर्व संशयित १५ प्रवाशांना तपासणीअंती करोनाचा संसर्ग झालेला नसल्याचे पुण्यातील एनआयव्ही संस्थेने कळवले आहे. त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या या रुग्णांना घरी सोडण्यात येत आहे. पुणे येथे दाखल असलेल्या पाच रुग्णांना तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात असलेल्या पाचपैकी तीन जणांना घरी सोडले आहे. उरलेल्या दोघांना उद्यापर्यंत घरी सोडण्यात येणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ROhEJ9

No comments:

Post a Comment