Tuesday, January 29, 2019

कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन

'आवाज कुणाचा...' या घोषवाक्याला 'कामगारांचा...' असं निर्विवाद उत्तर देणारे देशातील कामगार चळवळीचे अध्वर्यू, अघोषित 'बंदसम्राट' व देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून शारीरिक व्याधींशी झुंजणाऱ्या फर्नांडिस यांच्यावर काही दिवसांपासून दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

from The Maharashtratimes http://bit.ly/2HBX37P

No comments:

Post a Comment