Tuesday, July 31, 2018

कॅन्सरच्या उपचारासाठी 22 घरांमध्ये चोरी, आरोपी अटक

मुंबई : कॅन्सरच्या उपचारासाठी पैसे जमवण्यासाठी एका व्यक्तीने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे प्रकरण समोर आलं आहे. सलीम शेख असं या चोराचं नाव आहे. सलीमने दादरमध्ये 22 घरांमध्ये चोरी केल्याचं उघड झालं आहे.

सलीम उस्मानाबादचा रहिवासी असून तो फुप्फुसांच्या कॅन्सरने पीडित आहे. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी सलीमने काही दिवसांपूर्वी मुंबईतील अर्धायु इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये चोरी केली होती. याठिकाणी सलीमने जवळपास 11 लाख रुपयांवर डल्ला मारला होता. मात्र सलीमची ही चोरी यशस्वी होऊ शकली नाही. अर्धायु इंडस्ट्रिअल इस्टेट येथे सलीमची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सलीमचा शोध सुरू केला. त्यावेळी सलीम उस्मानाबादचा रहिवासी असल्याचं पोलिसांना कळालं. सलीमला अटक करण्यासाठी पोलिसांनी त्याचं उस्मानाबादचं घर गाठलं. सलीम घरी नसल्याने पोलिसांनी त्याच्या पत्नीकडे सलीमबाबत चौकशी केली. सलीमच्या पत्नीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सलीमला अटक केली.

अटक झाल्यानंतर पोलिसांच्या चौकशीदरम्यान आपल्याला कॅन्सर असल्याची माहिती सलीमने दिली. आर्थिक परिस्थिती ठिक नसल्याने कॅन्सरच्या उपचारासाठी सलीमला पैशांची गरज होती. त्यामुळे पैसे जमवण्यासाठी चोरीचा मार्ग स्वीकारल्याची कबूली सलीमने दिली.

from home https://ift.tt/2mZpwre

No comments:

Post a Comment