Tuesday, July 31, 2018

बीडच्या अभिजीतने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवलं

बीड: मराठा आरक्षण, बेरोजगारी आणि बँकेचं कर्ज यामुळे पुन्हा एका तरुणानं आत्महत्या केली आहे.  बीड जिल्ह्यातल्या विडा गावात अभिजीत देशमुख नावाच्या तरुणाने घराजवळच्या झाडाला गळफास लावून घेतला.  त्याच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षण, बँकेचं कर्ज आणि बेरोजगारी या बाबींचा उल्लेख आहे. 35 वर्षीय अभिजीत देशमुखनं विज्ञान शाखेतून MSC चं शिक्षण घेतलं होतं. मात्र नोकरी नसल्यामुळे तो अस्वस्थ होता. केज पोलीस ठाण्यात या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.  नोकरी नाही आणि पैसा नसल्यामुळे व्यवसायही करता येत नाही, असं काही दिवसांपासून तो मित्रांशी बोलत होता, अशी माहिती आहे. मराठा आरक्षणासाठी पाचवी आत्महत्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ही पाचवी आत्महत्या आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका गावात 22 जुलैला काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर 24 जुलैला औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील देवगाव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांनी विष प्राशन केल. उपचारादरम्यान त्यांचा 25 जुलैला मृत्यू झाला. मग 29 जुलैला नांदेडमधील दाभड येथील कचरु दिगंबर कल्याणे  या 42 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर सोमवारी 30 जुलैला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी इथे राहणाऱ्या प्रमोद होरे पाटील या 31 वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे प्रमोदने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर मराठा आरक्षण मिळावं, यासाठी आत्महत्या करत असल्याची पोस्ट लिहिली होती. आज 31 जुलैला बीडमध्ये 35 वर्षीय अभिजीत देशमुखनं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. संबंधित बातम्या  मराठा आरक्षणासाठी आत्महत्या, फेसबुक पोस्ट लिहून रेल्वेसमोर उडी   मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी मारणारा काकासाहेब शिंदे कोण होता?   काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, मोर्चेकऱ्यांनी चंद्रकांत खैरेंना हाकललं

from home https://ift.tt/2KdIvHs

No comments:

Post a Comment