औरंगाबाद : राज्याचे माजी मंत्री आणि सिल्लोड-सोयगाव विधानसभेचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. त्यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली आणि सरकार मराठा समाजासोबतच सर्वांवर अन्याय करत असल्याचं सांगत विधानसभेचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे राजीनामा सोपवला. मराठा आरक्षणासाठी राज्यात सगळीकडे आंदोलन सुरु आहे. राजकीय पक्षांच्याही यासाठी बैठकांवर बैठका सुरु आहेत. राज्यातील आतापर्यंत पाच आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. अब्दुल सत्तार राजीनामा देणारे सहावे आमदार ठरले आहेत. यापूर्वी काँग्रेसचे भरत फाळके, भाजपचे राहुल आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे, शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी राजीनामे दिले आहेत. या यादीत आता अब्दुल सत्तार यांचाही समावेश झाला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांची विधानभवनात बैठक झाली. यामध्ये काँग्रेस आमदारांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमोर तीव्र भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे सर्व आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत असल्याचंही वृत्त समोर आलं होतं. संबंधित बातम्या : राज-उद्धव यांचा मराठा आरक्षणाला विरोध, नारायण राणेंचा दावा शरद पवारांकडून आगीत तेल ओतण्याचं काम : शिवसेना आमदार  मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करता येईल का? राज्यभरात सर्व्हे  मराठा आरक्षण : काँग्रेस आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत
from home https://ift.tt/2vg4tEz
No comments:
Post a Comment