Tuesday, July 31, 2018

मोदींवर रासायनिक हल्ल्याची धमकी, तरुण अटकेत

<strong>मुंबई :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रासायनिक हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या काशिनाथ गुनाधार मंडल या 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. डी.बी. मार्ग पोलिसांच्या एका विशेष पथकाने मुंबई सेंट्रलमधून मंडलला अटक केली आहे. दिल्लीतील कंट्रोल रुमला शुक्रवारी एका अज्ञात व्यक्तीने नरेंद्र मोदींवर रासायनिक हल्ला करण्याची धमकी दिली होती. ही धमकी समोर येताच संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. सुरक्षा यंत्रणांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा फोन नंबर ट्रेस केला असता तो मुंबईत असल्याचं समोर आलं. आता अखेर संबंधिताला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अटक करण्यात आलेला तरुण काशिनाथ मंडल हा मूळचा झारखंडचा आहे. सध्या तो वाळकेश्वर परिसरात राहत होता. ‘झारखंडमधील एका नक्षलवादी हल्ल्यात माझा मित्र मारला गेला. त्याबाबत मला पंतप्रधानांना भेटायचं होतं,’ असं या तरुणाने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितल्याचं एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे.  

from home https://ift.tt/2LBr6OM

No comments:

Post a Comment