Monday, July 30, 2018

सरण रचून विष प्यायला, बुलडाण्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

<strong>बुलडाणा :</strong> बुलडाण्यात एका तरुण शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून, त्यानंतर विष प्राशन करुन आत्महत्या केली. सिंदखेडराजा तालुक्यातील सावरखेड तेजन गावात ही धक्कादायक घटना घडली. गजानन जायभाये (वय 32 वर्ष) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. गजानन जायभाये यांची तीन एकर शेती आहे. मात्र कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर महाराष्ट्र बॅंकेचे 70 हजार रुपयांचं कर्ज होतं. त्यात कर्जमाफीच्या गोंधळामुळे त्यांना आणखी कर्ज मिळू शकलं नाही. या सगळ्याला कंटाळून गजानन जायभाये यांनी काल रात्री उशिरा (29 जुलै) आपल्या शेतात सरण रचलं. त्यानंतर विष प्राशन करुन आत्महत्या केली. पोलिसांनीही आत्महत्येच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

from home https://ift.tt/2mUb3wE

No comments:

Post a Comment