Monday, July 30, 2018

भरवस्तीत बिबट्या घुसला, हल्ल्यात तरुण जखमी

<strong>मुंबई :</strong> मुलुंडच्या राहुलनगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने सुरज गवई या तरूणावर हल्ला केला. या हल्ल्यात सुरजच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. सुरजला सध्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री दोनच्या सुमारास घराबाहेर बांधलेल्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागल्याने सुरजचे कुटुंबीय जागे झाले. घराचा दरवाजा उघडताच कुत्र्यांवर चाल करून येत असलेला बिबट्या सुरजला दिसला. बिबट्याला विरोध करण्याचा प्रयत्न करताच बिबट्याने सुरजवर झेप घेतली आणि त्याला जखमी केलं. परिसरातील इतर लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे भेदरलेल्या बिबट्याने अखेर त्या ठिकाणाहून पळ काढला. शिकारीसाठी कुत्र्यांच्या मागावर असताना बिबटे अनेकदा मानवी वस्तीत प्रवेश करतात. याधीही परिसरातील लोकांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवर वसलेल्या रहिवासी वस्तीत दहशतीचं वातावरण आहे.

from home https://ift.tt/2LOaHWg

No comments:

Post a Comment