मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थिती पाहता आज सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. दुपारी १२ वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. या बैठकीनंतर पक्षाचं शिष्टमंडळ राज्यपाल आणि राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसनंही आपल्या आमदारांची बैठक बोलावली असून, दुपारी १२ वाजता विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या निवास्थानी ही बैठक होणार आहे.
from home https://ift.tt/2mQ0z14
No comments:
Post a Comment