<strong>गोंदिया :</strong> दारुबंदीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत महिलाशक्तीचा दणदणीत विजय झाला. गोंदिया जिल्ह्यातील खमारी गावात दारुबंदी करण्यासाठी मतदान घेण्यात आलं. महिलाशक्तीच्या या विजयानंतर गावात रॅली काढत जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. खमारी गावात गुन्हेगारी वाढत आहे, लहान मुलांना व्यसनं लागत आहेत. या समस्या लक्षात घेत महिलांनी गावातील परवानाधारक आणि अवैधरित्या दारु विकणाऱ्या दुकानावर अनेकदा मोर्चे काढले. संपूर्ण गावात दारुबंदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र गावातील दारु व्यावसायिकांनी दुकाने बंद न केल्याने अखेर महिलांनी कायदा हातात घेतला. गावात चालणाऱ्या दारु दुकानात घुसून तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर महिलांवर पोलिसांनी फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हा प्रशासनाने महिलांचा दिवसेंदिवस दारु विरोधातील वाढता रोष पाहता गावात ग्रामसभा घेऊन दारुबंदी करण्याचा ठराव मागितला. महिलांनी मोठ्या प्रमाणात दारुबंदीला समर्थन दिल्याने अखेर जिल्हा प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करत खामरी गावात दारुबंदीसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात निवडणुकीला सुरुवात करण्यात आली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात आलं. 3398 महिलांनी मतदान करायचं होतं. मात्र 2180 महिलांनी मतदान केलं. यात आडव्या बाटलीला 1857 मते मिळाली, तर उभ्या बाटलीला केवळ 173 मते मिळाली. 150 मतं अवैध ठरवण्यात आली. अंतिम निकालात नारी शक्तीचा दणदणीत विजय झाल्यामुळे गावात रॅली काढून जल्लोष करण्यात आला.
from home https://ift.tt/2LYNbmg
No comments:
Post a Comment