Friday, July 27, 2018

ब्रेकफास्ट न्यूज : ठाणे : मराठा आंदोलनातील हिंसाचार, शिवसेना नगरसेविकेच्या पतीसह 36 जण अटकेत

ठाण्यातील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 36 जणांना अटक केली आहे. यामध्ये शिवसेना नगरसेविकेच्या पतीचाही समावेश आहे. मराठा मोर्चादरम्यान ठाण्यात बुधवारी आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्याचे व्हिडीओ, सीसीटीव्ही फूटेज आणि फोटोच्या मदतीनं हिंसक आंदोलन करणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घेतला आणि कारवाई केली. आजच्या दिवसात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. हिंसाचार करणाऱ्या अनेक जणांचा मराठा आंदोलनाशी संबंध नसल्याचा दावा पोलिस करत आहेत. ठाण्यातील शिवसेना नगरसेविका निर्मला कणसे यांचे पती शरद कणसे यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर नौपाडा आणि वागळे इस्टेट पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

from home https://ift.tt/2LTAut9

No comments:

Post a Comment