Monday, July 30, 2018

आता रोज बेळगावातून विमान उडणार

<strong>बेळगाव :</strong> बेळगावात सध्या आठवड्यातून तीनच दिवस विमानसेवा सुरु असते. मात्र आता आठवड्यातून सातही दिवस विमानसेवा सुरु राहणार आहे. येत्या 10 ऑगस्टपासून सेवा सुरु होणार आहे. येत्या 10 ऑगस्टपासून एअर इंडियाची बेळगाव विमानतळावरुन विमान सेवा सुरु होणार आहे. एअर बस 319 द्वारे ही सेवा सुरू होणार आहे. सध्या बेळगाव ते बंगळुरु अशी आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, बुधवार आणि शनिवार अशी अलायन्स एअरलाईन्सची सेवा सुरु आहे. उरलेल्या चार दिवशी एअर इंडिया आपली बेळगाव ते बंगळुरु अशी विमानसेवा उपलब्ध करून देणार आहे. बंगळुरुहून सकाळी सात वाजता निघून साडेआठ वाजता विमान बेळगावला पोहोचणार आहे. बेळगावहून सकाळी नऊ वाजता निघून 10 वाजून 20 मिनिटांनी बंगळुरुला विमान पोहोचणार आहे. काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या प्रादेशिक संचालकांनी बेळगाव विमानतळाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी विमानसेवेबाबत सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून बेळगावहून विमानसेवा सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी सिटीझन फोरमला दिले होते. मोठ्या विमानाची सेवा बेळगावहून सुरु होत आहे ही चांगली बाब आहे. विमानतळाच्या धावपट्टीचे मोठ्या विमानासाठी विस्तारीकरण झाल्यावर एअर इंडियाने एअरबस सेवा सुरु करण्याचे ठरवले असल्याचे बेळगाव विमानतळाचे प्रमुख राजेशकुमार मौर्य यांनी सांगितले.  

from home https://ift.tt/2Ai0mxe

No comments:

Post a Comment