Monday, July 30, 2018

दोंडाईचा नगरपरिषदेच्या नव्या वास्तूवरुन श्रेयवादाची लढाई

<strong>धुळे </strong><strong>:</strong> कामाच्या श्रेयवादाची लढाई भारतात नवी नाही. मात्र धुळ्यात काहीशी अनोखीच घटना घडली आहे. झालं असं की, दोंडाईचा नगरपरिषदेच्या नव्या वास्तूचे उद्घटन राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होते, मात्र त्याआधीच विरोधकांनी उद्घाटन करुन टाकले. <strong>नेमकं काय झालं...</strong> दोंडाईचा नगरपरिषदेवर प्रथमच रोजगार हमी योजना, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने भाजपचे वर्चस्व आहे. रावल यांच्या आई दोंडाईचा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आहेत. नगरपरिषदेची नवीन वस्तू असावी, यासाठी नगरपरिषदेत पूर्वी सत्ता असलेल्या माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्या गटाने देखील प्रयत्न केले होते. मात्र जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्याने साकार नवी वास्तू प्रत्यक्षात साकार झाली. त्यामुळे नगरपरिषदेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे ठरले होते. मात्र, त्याआधीच या इमारतीचे उद्घाटन रावल यांचा विरोधी गट असलेल्या देशमुख गटाने रविवारी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पाच दिवस अगोदर फीत कापून, नारळ फोडून केलं. या प्रकारामुळे मंत्री जयकुमार रावल यांनी माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यावर टीका करत झालेल्या प्रकारचा निषेध केला. तर या नवीन वास्तूसाठी आम्हीच 90 टक्के प्रयत्न केले, लोकांच्या  इच्छेला मान देऊन आम्ही हे औपचारिक उद्घाटन केलं, असे म्हणत हेमंत देशमुख यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्यावर टीका केली. या अनौपचारिक उद्घाटनानंतर दोंडाईचा नगर परिषदेच्या इमारतीची काच देशमुख गटातील समर्थकांकडून फोडण्यात आल्याचा आरोप रावल गटाने केला आहे. या सर्व प्रकारानंतर दोंडाईचामध्ये रावल-देशमुख समर्थकांमध्ये सोशल मीडियात युद्ध सुरु झाले आहे.

from home https://ift.tt/2K55GUB

No comments:

Post a Comment