Monday, July 30, 2018

खा. अडसूळांची तक्रार, आ. रवी राणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा

अमरावती: बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. रवी राणा यांनी सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत, अडसूळ यांनी ही तक्रार दिली होती. मुंबई येथील सिटी बँकमध्ये 900 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करुन, रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर खोटे मेसेज प्रसारित केल्याचा आरोप खासदार अडसूळ यांनी केला.  त्यामुळे रवी राणांविरोधात आपण 800 कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं अडसूळ यांनी म्हटलं आहे. रवी राणा यांचा आरोप काय? खासदार आनंदराव अडसूळ हे मुंबईतील सिटी बँकेचे अध्यक्ष आहेत. मात्र अडसूळ आणि त्यांचे स्वीय सहाय्यक सुनील भालेराव यांनी पदाचा गैरवापर करत, सीटी बँकेत 900 कोटींचा घोटाळा केला आणि बेहिशेबी संपत्ती जमवली, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. इतकंच नाही तर खासदार अडसूळ यांनी गोरगरीब जनता, पेन्शनधारकांचे पैसे लाटल्याची पोस्ट रवी राणा यांनी सोशल मीडियावर केली होती. खासदार अडसूळ यांचा दावा रवी राणा यांनी सोशल मीडियावर आरोप करुन बदनामी केली. मात्र रवी राणा यांनी याबाबतची कोणतीही तक्रार पोलिस स्टेशन किंवा संबंधित विभागाकडे केली  नाही. आपण अनुसूचित जाती, जमातीचे सदस्य आहेत. त्यामुळे रवी राणा यांनी जाणीवपूर्वक आपली बदनामी केली, असा दावा खासदार अडसूळ यांनी केला आणि रवी राणांविरोधात अट्रोसिटीची तक्रार दाखल केली.

from home https://ift.tt/2K662ub

No comments:

Post a Comment