मशरफी मोर्तझाच्या बांगलादेशनं नऊ वर्षानंतर आशिया खंडाबाहेर वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवलाय. बांगलादेशनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत 18 धावांनी विजय साजरा केला. या विजयासह बांगलादेशनं तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. सलामीवीर तामिम इक्बालच्या शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशनं सहा बाद 301 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर ख्रिस गेल, शाई होप आणि रोवेन पॉवेलच्या झुंझार अर्धशतकानंतरही वेस्ट इंडिजला सहा बाद 283 धावांची मजल मारता आली. याआधी 2009 साली बांगलादेशनं झिम्बाब्वेमध्ये 4-1 असा मालिकाविजय साजरा केला होता. दरम्यान, या सामन्यात बांगलादेशचा सलामीवीर तमीम इकबालने 124 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 103 धावा ठोकल्या. त्याला मोहमद्दुलाने 49 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 67 धावा करत उत्तम साथ दिली. बांगलादेशचं 302 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेले वेस्ट इंडिजचे सलामीवीर ख्रिस गेल आणि एव्हिन लेविस यांनी झोकात सुरुवात केली. मात्र लेविसचा जम बसण्यापूर्वीच त्याला मोर्तझाने तंबूत धाडला. गेलने 66 चेंडूत 5 षटकार आणि 6 चौकारांसह 73 धावा ठोकल्या. होपने 64 तर पॉवेलने नाबाद 74 धावा केल्या पण वेस्ट इंडिजच्या विजयासाठी त्या पुरेशा ठरल्या नाहीत.
from home https://ift.tt/2LXq0Zz
No comments:
Post a Comment