नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये मराठा क्रांती मोर्चाला लागलेल्या हिंसक वळणामुळे एका तरुणाचा बळी गेला. दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या 21 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोपरखैरणेमध्ये बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मराठा मोर्चाला हिंसक स्वरुप प्राप्त झालं. यावेळी आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. त्या दगडफेकीत एक तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी तरुणाला मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु होते. काल सकाळी त्याने उपचारांना साथ देणं सोडलं. सकाळी 11 वाजताच्या सुमारास तरुणाने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती जेजे रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.
from home https://ift.tt/2uVDE96
No comments:
Post a Comment