Friday, July 27, 2018

ब्रेकफास्ट न्यूज : राज्यात सर्वत्र गुरुपौर्णिमेचा उत्साह, मंदिरं सजली, भाविकांच्या दर्शनासाठी रांगा

आज गुरूपौर्णिमा.. आपल्या आयुष्यात गुरूचं स्थान अढळ असतं. गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं राज्यभरात विविध मंदिरं सजली आहेत.. शिर्डीच्या साईबाबा मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे... तर साईसंस्थान भाविकांचं मोठ्या उत्साहात स्वागत करतंय.. कोल्हापुरातल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीचं दत्त मंदिर गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांच्या मोठ्या गर्दीनं फुलून गेलंय... सोलापूरमधील अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळतेय... मंदिरापासून दोन किलोमीटरपर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळताहेत... तिकडे बुलडाण्यातल्या शेगावात<br />श्री गजाननमहाराजांच्या नामगजरात भाविकांनी अगदी सकाळी 5 वाजल्यापासून गर्दी केलीय. आणि आजच्या गुरुपौर्णिमेचा मोठा उत्सव साजरा करतायत...

from home https://ift.tt/2LQxCgp

No comments:

Post a Comment