उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांचा विजय झाला. त्यांना पदभार देण्यासाठी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती. महापौरपदाच्या दालनात जाताच त्यांना खुर्चीच्या मागे असलेला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा फोटो दिसला अन् ते खवळले. नेत्याचे आदेश येताच फोटो काढण्यासाठी कार्यकर्ते पुढे आले. भाजपच्या नेत्यांच्या तसबिरी काढल्यानंतर जंजाळ यांना पदभार देण्याचा सोहळा रंगला.
from The Maharashtratimes https://ift.tt/2sBvXag
No comments:
Post a Comment