<strong>कोल्हापूर:</strong> काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेला आज कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे. सकाळी 10 वाजता अंबाबाईच्या दर्शनानं या यात्रेला सुरुवात होईल. सकाळी 11 वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातून ही जनसंघर्ष यात्रा जाणार आहे. या माध्यमातून सध्याची राजकीय परिस्थिती, महाराष्ट्र सरकारचं लोकविरोधी धोरण जनतेसमोर मांडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. कोल्हापूरमध्ये संध्याकाळी कळंबा इथं जाहीर सभा होणार आहे. कळंबा हा विधानपरिषद आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वी नेतृत्त्व केलेल्या कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघातील मोठं गाव आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्या हातकणंगले, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या इचलकरंजी आणि दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या शिरोळ या गावांमध्ये काँग्रेसच्या सभा होणार आहेत. <strong>सांगली</strong> काँग्रेसची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा कोल्हापूरहून सांगलीकडे निघेल. सांगली शहर, आमदार विश्वजित कदम यांच्या पलूस-कडेगाव या मतदारसंघात सभांचा फड रंगणार आहे. <strong>कराडमध्ये सभा</strong> मग तिसऱ्या दिवसाची सुरुवात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दक्षिण कराड मतदारसंघातून होणार आहे. माण या आमदार जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात पुढची सभा होणार आहे. <strong>सोलापूर</strong> सोलापूर जिल्ह्यतही जनसंघर्ष यात्रा जाणार आहे. सोलापुरात आमदार भारत भालके यांच्या पंढरपूर मतदारसंघात पहिली सभा आहे. मग आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात तर तिसरी सभा आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मतदारसंघातील अक्कलकोट इथं होणार आहे. यानंतर इंदापूर, पुणे अशी ही जनसंघर्ष यात्रा निघणार आहे.
from home https://ift.tt/2CbXHqa
No comments:
Post a Comment