<p>पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादेत घडली. कृष्णा तात्याराव देवरे असं कुटुंब संपवून गळफास घेणाऱ्याचे नाव आहे. 30 वर्षीय कृष्णा देवरेने 4 आणि 6 वर्षाच्या मुलींना गळफास लावून ठार केलं. त्यानंतर पत्नीच्या डोक्यात कुदळ मारुन हत्या केली आणि स्वत:ही गळफास घेतला.</p> <p>फुलंब्री तालुक्यातील सताळ पिंपरी इथं ही थरारक घटना घडली. एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.</p>
from home https://ift.tt/2or1VjY
No comments:
Post a Comment