नाशिक : नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर भाजप नगरसेवकांनी मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घेतला. मुख्यमंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्तक्षेपामुळे नगरसेवक बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. शनिवारी 1 सप्टेंबरला आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सत्ताधारी भाजपने केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक भाजपला झटका देत तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश नगरसेवकांना दिले होते. यानंतर नगरसेवकांनी हा ठराव अखेर रद्द केला आहे. मुंढेही एक पाऊल मागे? नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचे हत्यार उपसल्याने, ते बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. ज्या करवाढीचा मुदा पुढे करुन मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला, ती करवाढ मुंढे यांनी काही अंशी मागे घेतली. मोकळ्या भूखंडावर 40 पैसे प्रती स्क्वेअर फूट लावलेली करवाढ 3 पैशापर्यंत मागे घेण्यात आली. आरसीसी बांधकामवर दोन रुपयांऐवजी एक रुपया करवाढ ठेवण्यात आली. शैक्षणिक संस्थावर लावण्यात आलेला अनिवासी कर मागे घेण्यात आला आहे. यासह इतर आस्थापनांवर काही अंशी सवलत देण्यात आली आहे. माझा हस्तक्षेप | तुकाराम मुंढे का टिकत नाहीत?  आयुक्तांच्या या निर्णयामुळे नाशिककरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मुंढेंनी नवीन दर जाहीर केल्याने राजकीय पक्ष काय भूमिका घेतात त्याकडे लक्ष लागलं आहे. मुंढेंच्या समर्थनार्थ कॅम्पेन कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सत्ताधारी भाजपने अविश्वास ठरावाची तयारी केली होती. मात्र भाजपच्या या प्रस्तावाविरोधात नाशिककर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ नाशिककर आता एकवटले होत. नाशिककरांनी मुंढेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मोहीम सुरु केली होती. ट्विटरवर #WeSupportMundhe #NashikForMundhe #NashikSupportsMundhe असा ट्रेंड चालवला जात होते. तर तरुणाईकडून अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करुन त्यावर सत्ताधारी भाजपसह सर्वच नगरसेवकांविरोधात संताप व्यक्त केला होता. ... तर नक्कीच बदली करा ''माझी बदली करुन नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर नक्कीच बदली करा,'' असं आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले होते. शिवाय वारंवार बदली केली जाते याचं नक्कीच वाईट वाटतं, पण निर्णय शासनाचा असतो, असंही त्यांनी एबीपी माझाला सांगितलं होतं. संबंधित बातम्या  नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव
स्पेशल रिपोर्ट : हे फक्त तुकाराम मुंढेंच्या बाबतीतच का?
तुकाराम मुंढेंच्या समर्थनासाठी नाशिककर एकवटले  माझा हस्तक्षेप | तुकाराम मुंढे का टिकत नाहीत?

from home https://ift.tt/2wxSp26
No comments:
Post a Comment