मुंबईची फुफ्फुसं म्हणून ओळखल्या जाणा-या आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारण्यासाठी हजारो झाडांची कत्तल होतेय...मात्र, याच आरे कॉलनीतल्या मृत नर्सरीला पुन्हा संजीवनी देण्याचं काम अभिनेता सयाजी शिंदे आणि त्यांच्या सहकारी सामाजिक संस्था करतायेत...मेट्रो मुंबईकरांच्या विकासासाठी धावणार, तिला नुसताच विरोध करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत आपण काय करु शकतो याचा विचार या लोकांनी केला. आणि त्यातुनच तब्बल 25 हजार रोपांच्या रोपवाटीकेची संकल्पना जन्माला आली...अरे कॉलनीत नर्सरीच्या जागेवर गर्दुल्ल्यांनी अतिक्रमण केलं होतं, दारुच्या बाटल्यांचा खच पडला होता...मात्र आता तिथे नंदनवन फुलतंय.
from home https://ift.tt/2LJShqw
No comments:
Post a Comment