Wednesday, August 1, 2018

अनंत अंबानी आणि राधिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा तिसरा मुलगाही लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा आहे. इशा, आकाश अंबानी यांच्या साखरपुड्यानंतर त्यांचा धाकटा भाऊ अनंत अंबानीच्या कथित गर्लफ्रेण्डचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राधिका मर्चंट नावाच्या तरुणीसोबत अनंतचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील दोघांचा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरं तर फार आधीपासूनच अनंत-राधिका रिलेशनशीपमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या फोटोतील त्यांची जवळीक पाहून या चर्चांवर शिक्कामोर्तब झाल्याचं चित्र आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांची कन्या इशा अंबानी ही आनंद पिरामलसोबत विवाह करणार आहे. तर तिचा जुळा भाऊ म्हणजेच आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा काही महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला. आकाशच्या साखरपुड्यात राधिकाच्या डान्सनंतर अभिनेता शाहरुख खान अनंतला छेडत होता. एक ते दहापैकी राधिकाच्या परफॉर्मन्सला किती गुण देशील असा प्रश्न विचारताच अनंत 'दहा लाख.. अनंत (इन्फिनिटी)' असं तो लाजत-मुरडत म्हणाला. राधिका ही 'अँकर हेल्थकेअर'चे उपाध्यक्ष आणि सीईओ विरेन मर्चंट यांची कन्या आहे. अनंत आणि राधिका अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. राधिकाने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं आहे. तिला स्वीमिंग, ट्रेकिंग, वाचनाची आवड आहे. राधिकाने 2017 साली इस्पर्व ही रिअल इस्टेट फर्म जॉईन केली होती. राधिका या कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहते. 23 वर्षांचा अनंत आपल्या दादा-ताईपाठोपाठ लग्नाच्या बंधनात अडकणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

from home https://ift.tt/2mVC3vM

No comments:

Post a Comment