Wednesday, August 1, 2018

सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकेसाठी मतदान

सांगली/जळगाव : सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सांगली-मिरज-कुपवाडच्या 78 तर जळगावच्या 75 जागा अशा दोन्ही महानगरपालिकेच्या एकूण 153 जागांसाठी 754 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सांगली- मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेसाठी  सकाळी 7.30 वाजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शुक्रवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. दोन्ही ठिकाणी एकूण सात लाख 89 हजार 251 मतदार आहेत. त्यासाठी 1013 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक तेवढी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 5 हजार 792 अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सांगली- मिरज- कुपवाड महापालिका एकूण प्रभाग - 20 जागा - 78 उमेदवार - 451 मतदार - 4 लाख 24 हजार 179 मतदान केंद्रे - 544 जळगाव महापालिका एकूण प्रभाग - 19 जागा - 75 उमेदवार - 303 मतदार - 3 लाख 65 हजार 72 मतदान केंद्रे  - 469 सांगली - 78 जागांसाठी 451 उमेदवार रिंगणात काँग्रेस – 44, राष्ट्रवादी - 34, भाजप - 78, शिवसेना - 56, अपक्ष विकास महाआघाडी - 43, स्वाभिमानी विकास आघाडी - 20, सांगली जिल्हा सुधार समिती - 21, एमआयएम - 8 संबंधित बातम्या  सांगली महापालिकेसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात काय काय?   ईव्हीएम गुजरातहून सांगलीत, खोटा मेसेज पसरवणाऱ्यावर गुन्हा   रणसंग्राम महापालिकेचा : जळगावकरांसमोरचा नवा पर्याय कोणता? थेट जळगावातून   जळगाव महापालिकेत खरी लढत शिवसेना आणि भाजपातच!

from home https://ift.tt/2O0YOtE

No comments:

Post a Comment