<strong>मुंबई :</strong> महाराष्ट्रात किंवा देशातच नव्हे, तर जगभरात मराठीचा झेंडा फडकवणाऱ्या मराठमोळ्या रत्नांचा 'माझा सन्मान' पुरस्काराने गौरव करण्यात आला. 'एबीपी माझा'च्या 'माझा सन्मान' पुरस्कार सोहळ्यात समाजसेवा, कला, क्रीडा, विज्ञान, उद्योग क्षेत्रातील दहा दिग्गजांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दहा दिग्गजांना 'माझा सन्मान' प्रदान करण्यात आला. क्रिकेट विश्वातील उगवता तारा पृथ्वी शॉ, मराठीसह बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर, सामाजिक कार्यकर्ते अफरोज शाह, शास्त्रीय संगीतातले महारथी शौनक अभिषेकी, बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर, लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर, दुष्काळमुक्तीसाठी झटणारे पाण्याचे डॉक्टर- डॉ. अविनाश पोळ, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक प्रमोद चौधरी यांना यंदाचा मानाचा 'माझा सन्मान' प्रदान करण्यात आला. 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत खेळीमेळीत मुलाखत घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली. माझा सन्मान पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण तुम्हाला शनिवार 8 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता 'एबीपी माझा'वर पाहता येणार आहे. तर या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण रविवार 9 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता 'एबीपी माझा'वर होईल.
from home https://ift.tt/2ohR9fw
No comments:
Post a Comment