Thursday, August 30, 2018

'या' भारतीय क्रिकेटपटूकडून आफ्रिदीचं 'बूम बूम' नामकरण

मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला 'बूम बूम आफ्रिदी' या नावाने ओळखलं जातं. षटकार ठोकून समोरच्या संघाला गारद करण्याच्या आफ्रिदीच्या कौशल्यामुळे त्याचं हे नामकरण झालं. मात्र त्याला हे नाव कोणी दिलं, हे तुम्हाला माहित आहे का? भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आफ्रिदीला 'बूम बूम' हे नाव प्रदान केलं. ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आफ्रिदीने ही गोष्ट सांगितली. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेण्यापूर्वी रवी शास्त्री सामन्याचं समालोचन करत असत. त्यावेळीच त्यांनी आफ्रिदीला हे नाव ठेवलं. 398 एकदिवसीय सामन्यांमध्ये आफ्रिदीने 351 षटकार ठोकले आहेत, तर 99 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये त्याने 73 सिक्सर लगावले आहेत. 27 कसोटी सामन्यांमध्ये बूम बूम आफ्रिदीने 52 षटकार ठोकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाहिद आफ्रिदीच्या नावावर सर्वाधिक 476 षटकारांची नोंद आहे.

#AskLala who gave you the title #BoomBoom????????????????????
— Talha Attique???? (@Ch_Talha10) August 26, 2018

from home https://ift.tt/2Nv4a0l

No comments:

Post a Comment