सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. सकाळी साडेआठ वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गिरीश बापट यांच्या घराबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरक्षणाच्या मागणासाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. दुसरीकडे लातूर जिल्ह्यातल्या बाभळगावमध्ये आमदार अमित देशमुख यांच्या घरासमोरही कार्यकर्ते ठिय्या आदोलन करणार आहेत.
from home https://ift.tt/2AxrVmn
No comments:
Post a Comment