मराठी असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टी.. मागच्या ३ दशकांपासून एक आश्वासक चेहरा आपल्या सगळ्यांचं अव्याहत मनोरंजन करतोय. आपल्यासमोर एकापेक्षा एक चांगल्या कलाकृती सादर करतोय.. अस्तित्व सारख्या सिनेमामधून नात्यांमधील ग्रे शेड रंगवणारा नवरा असो.. \'मी शिवाजीराजे भोसले\' मधील प्रेमळ पण तत्वनिष्ठ वडिल, काकस्पर्शमधली हळवी वडिलधारी व्यतिरेखा असो किंवा तुफान हसवणारा सिंघम मधला गोट्या.. आतापर्यंत तुम्हाला अगदी सहज कळलं असेल आम्ही कुणाबरोबर बोलत आहे. अर्थात अभिनेते सचिन खेडेकर.. <br /><br />जितके ते सिनेमांमधून भावतात.. तितकेच नाटक, मालिका, रिएलिटी शोमधूनही आवडतात.. गेल्या काही दिवसात अनेक सिनेमांमधून वडिलांच्या भूमिकेच्याही त्यांनी इतक्या शेड्स रंगवल्या की वडिल असावेत तर असे अशीच भावना निर्माण होते. आणि आता त्यांचा टेक केअर गूड नाईट हा नवा सिनेमा येतोय. आणि या सिनेमाच्या निमित्तानं सचिन खेडेकर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत.
from home https://ift.tt/2okkohZ
No comments:
Post a Comment