Wednesday, August 1, 2018

व्हॉट्सअॅपवर ग्रुप व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग सुरु

<strong>मुंबई :</strong> ग्रुपसोबत पिकनिक किंवा हँगआऊटचा प्लॅन करायचा असेल, तर चर्चेसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटिंगचा ऑप्शन बरा पडतो. मात्र ग्रुपमध्ये टायपिंग करुन बोटं दुखत असल्यास आता तुम्हाला ग्रुप व्हिडिओ कॉल करता येणार आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या यूझर्ससाठी हा नवा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. आयओएस आणि अँड्रॉईड डिव्हाईसवर व्हॉट्सअॅप यूझर्सना व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. एका वेळी चार यूझर्ससोबत तुम्ही ग्रुप व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल करु शकाल. मे महिन्यातच व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुकने यासंदर्भात घोषणा केली होती. <strong>ग्रुप व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल कसा कराल?</strong> <p style="text-align: justify;">1. सर्वात आधी ज्यांना व्हिडीओ कॉल करायचं आहे, त्या युजरचं चॅट ओपन करा. 2. चॅट ओपन केल्यानंतर व्हिडीओ कॉलिंग बटनावर क्लिक करा. 3. त्यानंतर व्हिडीओ कॉल करा आणि यूजर कॉल रिसिव्ह करेपर्यंत वाट पाहा. 4. एकदा पहिल्या युजरने कॉल रिसिव्ह केल्यानंतर तुम्ही इतर दोन युजर्सना कॉल करु शकता. 5. यासाठी तुम्हाला अॅड कॉन्टॅक्टवर क्लिक करावं लागणार आहे 6. नाव सर्च करून तुम्हाला कॉल करायचं आहे त्या युजरचं नाव अॅड करा 7. तिसऱ्या आणि चौथ्या युजरला जोडल्यानंतर त्याबाबतचं नोटिफिकेशन इतर दोन युजर्सना जाईल.</p> व्हॉट्सअॅप यूझर्स सध्या दररोज दोनशे कोटी मिनिटं व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉलवर व्यतित करतात. ग्रुप कॉल एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड असतील, याची हमी व्हॉट्सअॅपने दिली आहे. व्हॉट्सअॅपवर 2014 पासून वन टू वन व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. तर 2016 च्या अखेरीस व्हॉट्सअॅपने यूझर्सना व्हिडिओ कॉलिंगची सोय करुन दिली.

from home https://ift.tt/2NWpZWs

No comments:

Post a Comment