राज्यभर कर्जापोटी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी विक्रमी आकडा गाठला असताना महानायक अमिताभ बच्चन यांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. २०० कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यावर भरून त्यांनी पडद्यावरच नव्हे तर आपण प्रत्यक्ष आयुष्यातही महानायक असल्याचे सिद्ध केले आहे. बच्चन यांनी एक कोटी २५ लाख रुपये या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात भरले आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/2wq8hUV
No comments:
Post a Comment