<p>राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपकडून विधानपरिषदेवर गेलेल्या सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघांत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा मोठा संघर्ष पहायला मिळतोय.</p> <p>भाजपचे पदाधिकारी सतीश शिंदे यांनी सुरेश धस यांच्याविरोधात उपोषण सुरु केलं आहे. पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सतीश शिंदे हे सध्या रुग्णालयात आहेत. असं असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री बारा वाजता रुग्णालयात जाऊन सतीश शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना उपोषण सोडायला लावलं.</p> <p>जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुरेश धस यांच्या पत्नीचा पराभव त्यांच्या नात्यातील सतीश शिंदे यांनी केला होता. त्यानंतर सतीश शिंदे आणि सुरेश धस हे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाऊ लागले.</p>
from home https://ift.tt/2Pdwogs
No comments:
Post a Comment