मुंबई : राज्य शासनाने विविध विकास महामंडळं, मंडळं आणि प्राधिकरणांच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवर 21 नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नियुक्त्या झाल्यानंतर काही तासातच नियुक्त्यावरून नाराजी आणि विरोधास सुरुवात झाली आहे.

प्रशांत ठाकूर यांच्या नियुक्तीला काँग्रेसचा विरोध प्रशांत ठाकूर यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. मात्र या नियुक्तीवर काँग्रेसने विरोध केला आहे. प्रशांत ठाकूर यांची कंपनी सिडकोची कंत्राटदार असून शेकडो कोटी रुपयांची कामे करत आहे. त्यामुळे हे लाभाचं पद असल्याचं सांगत प्रशांत ठाकूर यांच्या नियुक्तीला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोध केला.

शिवसेनेमध्येही नाराजी याशिवाय महामंडळाच्या नियुक्त्यांवरून शिवसेनेत प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. उदय सामंत, रघुनाथ कुचिक, नितिन बानुगडे-पाटील आणि विनोद घोसळकरांच्या नियुक्तीवरून शिवसैनिक नाराज असल्याचं बोललं जात आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपनं महामंडळं घोषित केली तेव्हाही शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी 'आम्हाला महामंडळंच नको' असं शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी म्हंटलं होतं. मात्र निवडणुकांच्या तोंडांवर महामंडळं घेणं ही युतीची लक्षणं आहेत का? अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

नव्याने घोषित केलेल्या नियुक्त्या

1) हाजी अरफात शेख - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग

2) जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर - उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग

3) बाळासाहेब ज्ञानदेव पाटील - सभापती, कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ

4) हाजी एस. हैदर आझम - अध्यक्ष, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

5) सदाशिव दादासाहेब खाडे - अध्यक्ष, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण

6) नरेंद्र अण्णासाहेब पाटील - अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

7) संजय उर्फ संजोय मारुतीराव पवार - उपाध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

8) आशिष जयस्वाल - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ

9) प्रकाश नकुल पाटील - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ

10) नितिन संपतराव बानगुडे-पाटील - उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ

11) जगदिश भगवान धोडी - उपाध्यक्ष, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ

12) उदय सामंत - अध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा)

13) श्रीमती ज्योती दीपक ठाकरे - अध्यक्ष, महिला आर्थिक विकास महामंडळ

14) विनोद घोसाळकर - सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ

15) विजय नाहटा - सभापती, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

16) रघुनाथ बबनराव कुचिक - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ

17) मधु चव्हाण - अध्यक्ष, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा)

18) संदीप जोशी - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ

19) प्रशांत ठाकूर - अध्यक्ष, शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको)

20) मो. तारिक कुरैशी - अध्यक्ष, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

21) राजा उर्फ सुधाकर तुकाराम सरवदे, अध्यक्ष, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ

from home https://ift.tt/2oq5gQf
No comments:
Post a Comment