सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील एका अधिकाऱ्याने पैसे घेऊन काम केले नाही म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या एकाने त्या अधिका-याची सर्वांसमक्ष धुलाई केली. मंत्रालयाच्या तिसऱ्या माळ्यावर बडोले यांचे कार्यालय आहे. त्यांच्या दालनाशेजारील कक्षात पीए, पीएस, अधिकारी, कर्मचारी बसतात. उस्मानाबादहून आलेले अरुण निटोरे यांनी शुक्रवारी दुपारी तेथील एका अधिकाºयाला कार्यालयातच गाठले आणि प्रश्नांची सरबत्ती केली. काम करवून घेण्यासाठी पैसे दिले, इतके दिवस वाट पाहिली पण काम होत नाही, असे सांगत त्याने गदारोळ घातला.
from home https://ift.tt/2N5nJAq
No comments:
Post a Comment