Saturday, September 1, 2018

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये शनायाच्या भूमिकेत 'ही' अभिनेत्री

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनायाची भूमिका साकारणाऱ्या रसिका सुनीलने सिरीअलचा निरोप घेतला. तिच्या जागी शनायाची भूमिका कोण करणार, हा शोध संपला आहे. 'जय मल्हार' मालिकेत बानूची व्यक्तिरेखा करणारी इशा केसकर शनायाच्या भूमिकेत दिसणार आहे. इशा केसकरने 'झी मराठी'वरील जय मल्हार मालिकेत साकारलेली बानूची व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती. याशिवाय तिने मंगलाष्टक वन्स मोअर, हेलो नंदन यासारख्या काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इशा आता शनायाची व्यक्तिरेखा कशी साकारणार, आणि प्रेक्षकांचा तिला कसा प्रतिसाद लाभतो, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.  'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या महाएपिसोडमधून नवी 'शनाया' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राधिका आणि गुरुनाथच्या संसारात खोडा घालण्याचं काम नवी शनाया कसं करणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. एरव्ही कलाकार एखाद्या बड्या प्रोजेक्टसाठी मालिका सोडतात, पण रसिकाने कुठला सिनेमा किंवा दुसऱ्या सिरीअल-नाटकासाठी 'माझ्या नवऱ्याची...'ला रामराम ठोकलेला नाही. परदेशात फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी रसिकाने ही मालिका सोडली. रसिकाने गेल्या वर्षी या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला होता, यंदा तिला प्रवेश मिळाला. रसिका भारतातच नसणार म्हणजे ती आपल्या आगामी 'गेट मेट' या सिनेमाच्या प्रमोशनलाही गैरहजर असेल. पण तिच्यासाठी मात्र हा गोल्डन शेक हॅन्ड आहे, नवीन काहीतरी शिकून जेव्हा रसिका परत येईल तेव्हा तिच्याकडे नक्कीच काहीतरी खास असेल.

from home https://ift.tt/2PULoB5

No comments:

Post a Comment