Tuesday, September 11, 2018

अनिकेत कोथळे खून : बडतर्फ PSI युवराज कामटेला न्यायाधीशांनी झापलं

सांगली : पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे खून प्रकरणातील मुख्य संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याची चलाखी अजूनही चालूच आहे. आरोपपत्राची प्रत बदलली जाईल, असा संशय व्यक्त करत युवराज कामटेने न्यायाधीशांकडे कागदपत्रांची मागणी केली. त्यामुळे न्यायाधीशांना त्याला चांगलंच झापलं अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सीआयडीने 5 फेब्रुवारीला न्यायालयात आरोपपत्र सादर केलं. सध्या या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु आहे. युवराज कामटेसह संशयितांवर काल (10 सप्टेंबर) आरोपनिश्‍चिती केली जाणार होती. त्यासाठी त्याला न्यायालयात आणलं होते. यावेळी न्यायालयात दोषारोपपत्र कागदपत्रावरुन कामटेने "प्रत बदलली जाईल',असा संशय व्यक्त करत न्यायाधीशांकडे कागदपत्रांची मागणी केली. त्यामुळे न्यायाधीशांनी कामटेला चांगलंच फैलावर घेत, त्याच्या वकिलांनी दिलेला अर्ज फेटाळला. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते. मम्मी यांनीच पप्पांना मारलं का, कोथळेच्या लेकीचा सवाल 6 नोव्हेंबर 2017 रोजी शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळेचा खून घडला होता. बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या साथीदारांनी कोठडीत चौकशी करताना अनिकेतला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. 10 सप्टेंबर 2018पासून या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी हजेरी लावली होती. यावेळी कामटेने दाखल दोषारोपपत्राची नक्कल प्रतीवर स्वाक्षरी आणि शिक्का देण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी त्याला न्यायालयात आणण्यात आले. नक्कल प्रत बदलली जाईल, असा संशय व्यक्त केला. त्याने अप्रत्यक्षपणे न्यायालयावरच संशय व्यक्त केल्याने न्यायाधीशांनी कामटेला चांगलेच सुनावले. सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू दरम्यान, कामटेसह त्याचे साथीदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले हे देखील न्यायालयात हजर होते. तर खुनाप्रकरणी आणखी पुरावे सीआयडीने गोळा केले आहेत. त्याचं पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अनिकेत कोथळे हत्या : युवराज कामटेची नार्को, ब्रेन मॅपिंग करा : CID अनिकेत कोथळे हत्या: युवराज कामटेच्या मामेसासऱ्याला अटक अनिकेतची हत्या पोलीस खात्याला कलंक, दोषींना फाशी द्या: आठवले अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न अनिकेतच्या हत्येचा आरोपी पीएसआय कामटेचा मुजोरपणा कायम

from home https://ift.tt/2O6vWkb

No comments:

Post a Comment