<strong>नवी दिल्ली</strong><strong> : </strong>केवळ राजकारणापोटी मला अडकवलं जातंय, मी कोणताही घोटाळा केला नाही, असा दावा मेहुल चोकसीने या मुलाखतीत केलाय. तसेच, घोटाळाच झाला नाही, असाही दावा मेहुल चोकसीने केला. 2000 सालानंतर माझा पंजाब नॅशनल बँकेशी कोणताही संबंध नव्हता, या घोटाळ्याबाबत ज्या-ज्या कारवाई करण्यात आल्या, त्या कोणत्याही नोटिसेशिवाय करण्यात आल्याचे आरोपही चोकसीने केलेत. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपींपैकी एक मेहुल चोकसी, ज्याचा कुणालाही थांगपत्ता लागत नव्हता, ज्याचं भारताकडे प्रत्यार्पण कधी होणार कुणालाच माहित नाही. मात्र या मेहुल चोकसीला एबीपी माझानं शोधून काढलंय. दिल्लीपासून 13 हजार किलोमीटर दूर असलेल्या अँण्टिगामध्ये मेहुल चोकसी सध्या आहे. आमच्या एबीपी न्यूजच्या प्रतिनिधी शिला रावल यांनी त्याला तिथं शोधून काढलंय. <strong>पाहा मेहुल चोकसीची संपूर्ण मुलाखत </strong><strong>:</strong> https://www.youtube.com/watch?v=Sh3FzEW4ZmU
from home https://ift.tt/2MkPcJ4
No comments:
Post a Comment