Wednesday, September 12, 2018

VIDEO: रशीदचा तो बॉल, ज्याने मॅच पलटली!

लंडन:  सलामीचा लोकेश राहुल आणि यष्टिरक्षक रिषभ पंतनं झळकावलेली शतकं, तसंच त्या दोघांनी सहाव्या विकेटसाठी रचलेल्या 204 धावांच्या भागिदारीनंतरही टीम इंडियाला ओव्हल कसोटी वाचवता आली नाही. या कसोटीत इंग्लंडनं भारताचा 118 धावांनी पराभव करून, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा निर्विवाद विजय साजरा केला. या कसोटीत इंग्लंडनं भारताला विजयासाठी 464 धावांचं आव्हान दिलं होतं. लोकेश राहुल आणि रिषभ पंत या शतकवीरांनी सहाव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचली. पण भारताचा दुसरा डाव 345 धावांत आटोपला. राहुलनं 20 चौकार आणि एका षटकारासह 149 धावांची खेळी उभारली. पंतनं 15 चौकार आणि चार षटकारांसह 114 धावांची खेळी केली. या दोघांची फलंदाजी सुरु असताना, भारत हा सामना जिंकू शकेल असं एकवेळ वाटत होतं. मात्र इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदने जबरदस्त लेगस्पिन टाकून राहुलला कळण्यापूर्वीच क्लीन बोल्ड केलं. रशीदने लेगला बॉल टाकून राहुलची ऑफस्टम्प उडवली. क्षणभर काय झालंय हे के एल राहुलला कळलंही नाही. राहुल बाद झाला आणि भारतानेही उरल्या सुरल्या आशा सोडल्या, तिथेच मॅच पालटली. VIDEO आदिल रशीदचा जबरदस्त लेग स्पीन

pic.twitter.com/L1jTbCqUFl
— Gentlemen's Game (@DRVcricket) September 11, 2018

from home https://ift.tt/2NzUBjZ

No comments:

Post a Comment