Saturday, September 1, 2018

वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी आयटी पार्कमधून 56 कंपन्यांचं स्थलांतर

<strong>पुणे :</strong> वाहतूक कोंडीमुळे राज्यातील सर्वात मोठ्या आयटी पार्कपैकी एक असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधून कंपन्या काढता पाय घेण्याच्या मार्गावर आहेत.  हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा  बोजवारा उडाल्यामुळे आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या सहा बहुराष्ट्रीय कंपन्या आणि 50 लहान कंपन्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधून स्थलांतर केल्याचं समोर आलं आहे. एकीकडे राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे, तर दुसरीकडे पायाभूत सुविधांमुळे कंपन्या स्थलांतर करत आहेत. वाहतूक कोंडीमुळे कंपन्यांना कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत असल्याचं बोललं जात आहे. पुण्यातून जाऊन हिंजवडीत काम करायचं म्हणजे आठ तासांच्या शिफ्टचा निम्मा वेळ म्हणजे साडे तीन ते चार तास फक्त प्रवासात जातात. त्यामुळे कंपनीतील अधिकाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय कंपन्यांचे सेमिनार किंवा इतर कार्यक्रमही हिंजवडीत घेता येत नाहीत. या कंपन्या आपले कार्यक्रम इतर शहरांमध्ये आयोजित करतात. कारण, वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणं शक्य होत नाही. गेल्या दोन वर्षांत हिंजवडी आयटी पार्कमधील दोन महत्त्वाच्या कंपन्या अनुक्रमे बालेवाडी आणि खराडी येथे स्थलांतरित झाल्या होत्या. त्यातच आता आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या पाच ते सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडी पार्कमधून काढता पाय घेतला आहे. तर पन्नासच्या आसपास लहान कंपन्या वाकड, बाणेर, बालेवाडी, तीर्थ आयटी टेक्नो स्पेस आणि पुण्यालगतच्या अन्य भागात स्थलांतरित झाल्या आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडी पार्कमधील त्यांचे ऑफ शोअर डेव्हलपमेंट सेंटर (ओएसडीसी) बंद केले आहे. वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना कंपनीत येण्यास उशिर होतो. कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांच्या इंधनावरही मोठा खर्च होत आहे. छोट्या कंपन्यांना त्याचा फटका बसत आहे. वाहतूक कोंडीमुळे कंपन्यांचं स्थलांतर हा रोजगाराच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.

from home https://ift.tt/2PV4Yx6

No comments:

Post a Comment