सकाळी उठल्यावर फ्रेश व्हायच्या आधी आपण हल्ली कुठली गोष्ट करतो तर मोबाईलवर सोशल साईट्स् चेक करणं.. मग तुम्ही कितीही घाईत असा, मोबाईल सकाळी हातात आला नाही असं होणं जवळपास अशक्य आहे.. आणि म्हणूनच आता तुम्हाला सध्या वायरल झालेल्या एका विडीओची आठवण करून देणं फारसं अवघड नाहीये. नुकतंच रक्षाबंधन झालं..आणि आपल्या मराठमोळ्या सणाच्या वेळी एक कॅनेडियन कलाकार मात्र आपल्याला शिकवत होती रक्षाबंधनाचे एटिकेट्स.. <br /><br />हा व्हिडीओ होता भारतीय डिजीटल पार्टी.. अर्थात भाडिप या पहिल्यावहिल्या मराठी युट्यूब चॅनलचा.. वेब जगतात धुमाकूळ घालणाऱ्या भाडिपची सुरूवात पॉला मॅग्लिन हिनं केली. आणि सारंग साठे आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या तुफान आयडीयांमधून तरूणांना आकर्षित करणारा एक स्ट्राँग प्लॅटफॉर्म तयार झाला.. पॉला मुळची कॅनडाची. सारंग पुण्याचा. पण कला ही अशी गोष्ट आहे जी भाषेच्या पलिकडली असते. आणि त्यातूनच सारंग आणि पॉला भाडिपच्या माध्यमातून एकापेक्षा एक हटके कन्टेंट तयार करतायत.
from home https://ift.tt/2NBQ25E
No comments:
Post a Comment