Monday, September 10, 2018

खा. प्रीतम मुंडेंवर आक्षेपार्ह टिप्पणी, फेसबुक लाईव्ह करुन शिक्षकाला मारहाण

<strong>पुणे :</strong> बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी संजय कुऱ्हाडे नामक शिक्षकाला फेसबुक लाईव्ह करुन मारहाण करण्यात आली. याप्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये गणेश कराडसह पाच ते सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांविषयी बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदमांच्या वक्तव्यावरून संजय कुऱ्हाडे यांनी 'प्रीतम मुंडे' देखील अविवाहित असल्याची टिप्पणी सोशल मीडियावर केली होती. याच रागातून गणेश कराड आणि त्याच्या साथीदारांनी फेसबुक लाईव्ह करून मारहाण आणि शिवीगाळ केली. संजय कुऱ्हाडे हे कॅम्प एज्युकेशनमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज दुपारी गणेश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कुऱ्हाडेंना निगडी येथील निवेदिता बँकेसमोर बोलावून घेतलं. फेसबुक लाईव्ह सुरू केलं. आधी पोस्ट केलेल्या वक्तव्याची माफी मागायला लावली आणि मग शिवीगाळ करत मारहाणही केली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी मारहाण आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गणेश कराड आणि त्याचे सहकारी हे मुंडे समर्थक असल्याची माहिती समोर येत आहे.

from home https://ift.tt/2NrrFe4

No comments:

Post a Comment