Monday, September 10, 2018

ओव्हल कसोटी : तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडकडे 154 धावांची आघाडी

<strong>लंडन :</strong> अॅलिस्टर कूक आणि ज्यो रूटने तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची अभेद्य भागीदारी रचून ओव्हल कसोटीत इंग्लंडला तिसऱ्या दिवसअखेर दोन बाद 114 अशी मजल मारून दिली आहे. या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 40 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं यजमानांची एकूण आघाडी 154 धावांची झाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी कूक 46 आणि रूट 29 धावांवर खेळत होता. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज केटन जेनिंग्सला मोहम्मद शमीने 10 धावांवर, तर मोईन अलीला रवींद्र जाडेजाने 20 धावांवर बाद केलं. त्याआधी, रवींद्र जाडेजा आणि हनुमा विहारीच्या झुंजार फलंदाजीने टीम इंडियाला सर्व बाद 292 धावांची मजल मारून दिली. जाडेजा आणि विहारीने सातव्या विकेटसाठी रचलेल्या 77 धावांच्या भागीदारीने भारताच्या पहिल्या डावात मोलाची भूमिका बजावली. जाडेजाने नाबाद 86 धावांची खेळी उभारून भारतीय संघातलं पुनरागमन गाजवलं. हनुमा विहारीने कसोटी पदार्पणात अर्धशतक साजरं करण्याचा पराक्रम गाजवला. त्याने 56 धावांची खेळी केली.

from home https://ift.tt/2O2AFmY

No comments:

Post a Comment