सिडनी : इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका आणि कसोटी मालिका गमावल्यानंतर पाचव्या कसोटीतही भारत पिछाडीवर आहेत. या कठीण काळात ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अॅडम गिलख्रिस्टने भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे.

भारताजवळ उत्कृष्ट दर्जाचे फलंदाज आणि गोलंदाज आहेत. मात्र परदेशात जिंकण्यासाठी भारतीय संघाला मानसिकरित्या मजबूत होणं गरजेचं आहे, असं गिलख्रिस्टने म्हटलं. पुढे गिलक्रिस्ट म्हणाला, विदेशात खेळणं भारतीय खेळाडूंसाठी आव्हानात्मक असतं. विरोधी संघाला अडचणीत आणणारे गोलंदाज भारतीय संघाकडे आहेत. याशिवाय आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक विराट कोहलीसह इतरही चांगले फलंदाज भारताकडे आहेत.

या भारतीय संघामध्ये विदेशात मालिका जिंकण्याची क्षमता आहे. मात्र खेळाडूंना यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं असल्याचं गिलख्रिस्टने सांगितलं. विराट कोहलीबद्दल बोलताना गिलख्रिस्ट म्हणाला, "विराट ज्याप्रमाणे सकारात्मकदृष्ट्या संघाला पुढे नेतो, त्याबद्दल त्याचं कौतुक करायला हवं."

भारतीय संघ नोव्हेंबरपासून जानेवारीपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या भारतीय संघ दौऱ्यात चार कसोटी , तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे.

संबधित बातम्या

ओव्हल कसोटी : तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडकडे 154 धावांची आघाडी

VIDEO: भर मैदानात शिखर धवनचा भांगडा

अनोखा विक्रम : इंग्लंड दौऱ्यात विराटच्या नशिबात ‘काटा’च!

इंग्लंडमध्ये नव्या विक्रमासाठी ईशांत सज्ज

from home https://ift.tt/2QiSEqO
No comments:
Post a Comment