मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे 'बिग बॉस'च्या बाराव्या पर्वात दिसण्याची शक्यता आहे. भजनसम्राट अनुप जलोटा यांनाही 'बिग बॉस'साठी विचारणा झाल्याची माहिती आहे. पुढच्या आठवड्यात 'बिग बॉस हिंदी' सुरु होणार असून काहीच दिवसांपूर्वी सूत्रसंचालक सलमान खानने या सिझनचं गोव्यात दिमाखदार लाँचिंग केलं होतं. बिग बॉसमध्ये यंदा 'विचित्र जोड्या' दिसणार आहेत. अभिनेत्री नेहा पेंडसेने 'भाग्यलक्ष्मी' या मराठी मालिकेत मुख्य भूमिका केली होती, तर 'एकापेक्षा एक अप्सरा आली' या डान्स रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीतही मजल मारली होती. टुरिंग टॉकिज, बाळकडू, नटसम्राट अशा चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही नेहा प्रसिद्ध आहे. 1996 मधील 'हसरतें' या हिंदी मालिकेत नेहाने बालकलाकार म्हणून भूमिका केली होती. त्यानंतर 'मे आय कम इन मॅडम?' या विनोदी मालिकेतील तिची भूमिकाही गाजली होती. फॅमिली टाईम विथ कपिलमध्येही नेहा दिसली होती. प्यार कोई खेल नही, देवदास, दिल तो बच्चा है जी अशा बॉलिवूडपटांमध्येही ती झळकली होती. कॉमेडियन भारती सिंग आणि पती हर्ष लिंबाचिया ही बिग बॉसमधील पहिली सेलिब्रेटी जोडी आहे. यूट्यूबर दीपक कलाल आणि स्प्लिट्सविला फेम स्कार्लेट रोझ सामान्य नागरिक म्हणून बिग बॉसच्या घरात शिरणार आहेत. कोणकोणत्या जोड्या झळकण्याची चिन्हं? अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि तिची बहीण 'दृष्यम' फेम अभिनेत्री इशिता दत्ता डॅनी डी आणि अभिनेत्री महिका शर्मा मिलिंद सोमण आणि पत्नी अंकिता कोवर  कोणकोणते सेलिब्रेटी दिसण्याची शक्यता प्रसिद्ध गायक अनुप जलोटा माजी क्रिकेटपटू श्रीशांत 'उतरन' फेम अभिनेत्री टिना दत्ता 'साथ निभाना साथिया' फेम गोपी बहू अर्थात अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी 'बहू हमारी रजनीकांत' फेम अभिनेत्री रिद्धिमा पंडित 'बालिका वधू' फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला 'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्री दीपिका कक्कर 'नागिन 2' फेम अभिनेता करणवीर बोहरा 'इष्कबाज' फेम अभिनेत्री सृष्टी रोडे टीव्ही अभिनेता शालीन भानोत कॉमेडियन किकू शारदा डीजे सुबुही जोशी कलर्स वाहिनीवर 16 सप्टेंबरपासून दररोज रात्री 9 वाजता 'बिग बॉस' पाहता येणार आहे.
from home https://ift.tt/2NyhpAA
No comments:
Post a Comment