Monday, September 10, 2018

रवींद्र जाडेजा धोकादायक खेळाडू : पॉल फार्ब्रेस

लंडन : इंग्लंड दौऱ्यात पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या रवींद्र जाडेजाने आपल्या कामगिरीने सर्वांच लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. इंग्लंडचे कोच पॉल फार्ब्रेस यांनीही जाडेजाचं भरभरून कौतुक केलं आहे. जाडेजा विरोधी संघासाठी धोकादायक खेळाडू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

रवींद्र जाडेजा केवळ एका सामन्यासाठी टीम इंडियात समाविष्ट करण्यात आलं याबद्दल पॉल फार्ब्रेस यांनी आनंदही व्यक्त केला.

जाडेजाचं कौतुक करताना फार्ब्रेस म्हणाले की, "जाडेजाने खुप उत्कृष्ट खेळी केली. जाडेजा त्याच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंगमुळे कोणत्याही विरोधी संघासाठी धोकादायक खेळाडू ठरू शकतो. इंग्लंडच्या संघाला शेवटच्या सामन्यात जाडेजाचा सामना करावा लागला याचा आम्हाला आनंद आहे."

जाडेजाला ओव्हलमध्ये सुरू असलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघात स्थान मिळालं. या सामन्यात जाडेजानं पहिल्या डावात 86 धावा केल्या आणि पाच विकेटही घेतल्या.

तिसऱ्या दिवशी जाडेजाने केलेल्या खेळीमुळे भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला. जाडेजाने तळाच्या खेळाडूंसोबत चांगली भागिदारी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवलं.

अॅलिस्टर कूक आणि ज्यो रूटने तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची अभेद्य भागीदारी रचून ओव्हल कसोटीत इंग्लंडला तिसऱ्या दिवसअखेर दोन बाद 114 अशी मजल मारून दिली आहे. या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 40 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं यजमानांची एकूण आघाडी 154 धावांची झाली आहे.

संबधित बातम्या

ओव्हल कसोटी : तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडकडे 154 धावांची आघाडी

VIDEO: भर मैदानात शिखर धवनचा भांगडा

अनोखा विक्रम : इंग्लंड दौऱ्यात विराटच्या नशिबात ‘काटा’च!

इंग्लंडमध्ये नव्या विक्रमासाठी ईशांत सज्ज

गिलख्रिस्टकडून भारताला विदेशात जिंकण्यासाठी कानमंत्र

from home https://ift.tt/2oT8BYj

No comments:

Post a Comment