Saturday, August 3, 2019

‘आयआयटी’च्या जागा ‘फुल्ल’

यंदाच्या वर्षी आयआयटीच्या देशभरातील सर्व जागा भरल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालया (एचआरडी) च्या वतीने शनिवारी देण्यात आली. 'यंदा देशभरातील सर्व आयआयटीमध्ये पदवीच्या अभ्यासक्रमासाठी एकूण १३ हजार ६०४ जागा उपलब्ध आहेत. या सर्व जागा भरल्या आहेत. आयआयटीच्या सक्रिय सहकार्यामुळे हे शक्य झाले,' असे 'एचआरडी'चे उच्च शिक्षण सचिव आर. सुब्रह्मण्यम यांनी सांगितले. गेल्या वर्षी देशभरातील २३ आयआयटींमध्ये एकूण ११८ जागा रिक्त होत्या.

from The Maharashtratimes https://ift.tt/2GIS5Do

No comments:

Post a Comment