Tuesday, September 11, 2018

मुंबई | शाळांमध्ये आजपासून दिवसातून तीन वेळा हजेरी होणार

मुलींवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा झटून कामाला लागल्या आहेत. शाळा, परिवार, सार्वजनिक ठिकाणी मुले सुरक्षित राहावीत याकरिता विशेष ‘रक्षा अभियान’ हाती घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आजपासून राज्यात ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजता पाटकर हॉल, चर्चगेट इथं शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी ही माहिती दिली आहे.

from home https://ift.tt/2O6Y1b5

No comments:

Post a Comment