मुंबईमध्ये आगीचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. चेंबूरच्या सरगम सोसायटीला लागलेल्या आगीला दोन दिवस उलटत नाहीत तोवर शनिवारी वरळी येथील साधना इंडस्ट्रियल इस्टेटला आग लागली. या ठिकाणी औषधे, केमिकल, केबल्स आणि प्लास्टिकचा साठा असल्याने आग पेटण्याऐवजी धुमसली. यामुळे वरळी परिसरात सगळीकडे धुराचे लोट पसरले होते. आगीवर नियंत्रण मिळवताना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने अग्निशमन दलाच्या दोन जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
from The Maharashtratimes http://bit.ly/2LDGkj1
No comments:
Post a Comment