<strong>अकोला :</strong> एकीकडे राज्यात काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीची चर्चा सुरू असतांना आंबेडकरांनी आघाडीच्या चर्चेला आणखी एक धक्का दिला आहे. प्रकाश आंबेडकरांनी बहुजन वंचित आघाडीचा राज्यातील लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. बुलडाणा लोकसभा मतदार संघातून आमदार बळीराम सिरस्कार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सिरस्कार अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार आहेत.
from home http://bit.ly/2RocPXF
No comments:
Post a Comment